ठाण्यात सुमारे चार लाखांचा गुटखा हस्तगत

ठाण्यात सुमारे चार लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. वसईहून ठाण्याच्या दिशेनं येणा-या टेम्पोमध्ये गुटखा असल्याची माहिती कापुरबावडी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार घोडबंदर रोडवरील आर मॉलजवळ पोलीसांनी गुटख्यासह टेम्पो पकडला. शासनानं बंदी घातलेल्या विविध कंपन्यांच्या सुपा-या आणि गुटख्याची विक्री छुप्या पध्दतीनं सुरू आहे. अनेक पान टप-यांवर लपून छपून गुटखा आणि बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहेत. या टम्पोमध्ये विविध कंपन्यांची साडे अठराशे गुटख्याची पाकिटं, २०० पाकिटं पानमसाला आणि १०५ तंबाखूची पाकिटं असा ४ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी टेम्पो चालक सुशीलकुमार करवार याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading