ठाण्यातील सी फूडस् निर्यातदारास ५ लाखांचा गंडा

ठाण्यातील सी फूडस् निर्यातदार शंतनु सूर्यवंशी यांना केरळच्या दोघा भामट्यांनी ५ लाखांचा गंडा घातला आहे. केरळमधील रोशन शहाबुद्दीन आणि धनराज मदुराई या दुकलीनं शंतनु सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून आपण सी फूड व्यवसायातील दलाल असल्याची बतावणी केली तसंच बँकॉक येथे गोड्या पाण्यातील विशिष्ट मासे पाठवण्याचे प्रलोभन दाखवले. सूर्यवंशी यांनी त्याप्रमाणे त्यांना विशिष्ट कोळंबी मासे पाठवले. या माशांचे ५ लाखांचे देयक शहाबुद्दीन यांनी परस्पर बँकॉकला जाऊन स्वीकारत सूर्यवंशी यांची फसवणूक केली.

Leave a Comment

%d bloggers like this: