ठाण्यातील सिग्नल शाळेला राष्ट्रीय स्तरावरील युगांतर पुरस्कार जाहीर

ठाण्यातील सिग्नल शाळेला राष्ट्रीय स्तरावरील युगांतर पुरस्कार जाहीर झाला आहे. बडोद्याच्या द इन्स्टीट्यूट ऑफ लिडरशीप अँड गव्हर्न्सच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. या विद्यापीठातर्फे २७ जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेत शाळेला युगांतर पुरस्काराने सन्मानित केलं जात असताना भटु सावंत यांना युथ हिरो म्हणून गौरवलं जाणार आहे. देशभरातील विविध क्षेत्रात काम करणा-या तरूणांसमोर सिग्नल शाळा प्रयोगाचे सादरीकरण ते करणार आहेत. देशभरातील १२ तरूण आणि त्यांच्या अभिनव प्रयोगांचा गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रीय युवा परिषद दरवर्षी एका विषयाला समर्पित असते. यावर्षीचा विषय राष्ट्र असून राष्ट्र बांधणीच्या कामात योगदान देणा-या प्रयोगांची निवड यंदा करण्यात आली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: