ठाण्यातील सर्वात जुनं असं नगर वाचन मंदिर आता १२ तास खुलं करण्यात आलं आहे. कालपासून प्रायोगिक तत्वावर हे वाचनालय सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत खुलं राहणार आहे. बदललेल्या वेळेमुळं ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळेतही वाचनाची आवड जोपासण्यास मदत होईल. १८५० साली स्थापन झालेल्या नगर वाचन मंदिराकडे ५० हजारांची ग्रंथसंपदा असून त्यामध्ये अनेक दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. लवकरच नगर वाचन मंदिरातर्फे ई-बुक्सही सुरू केली जाणार आहेत.
