ठाण्यातील दोघांचा ठाणे भूषण, ९६ जणांचा ठाणे गुणिजन तर २० जणांचा ठाणे गौरव पुरस्कारानं सन्मान.

ठाणे महापालिकेच्या ३६व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून ठाण्याच्या विकासात महत्वाचं योगदान देणा-या अनेक नामवंत व्यक्तींना ठाणे भूषण, ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राच्या लोककलेचा महाराष्ट्राबरोबरच जगात प्रचार आणि प्रसार करणारे डॉ. प्रकाश खांडगे आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. जालिंदर भोर  यांना यंदाचा ठाणे महापालिकेचा मानाचा ठाणे भूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी मधुकर पाटकर, धनंजय निंबाळकर, शशिकांत नाईक, चंद्रकांत भोईटे, अरविंद विंचुरे, डॉ. चंद्रशेखर वावीकर, विश्वासराव सकपाळ, वैशाली ईराणी, सुरेखा यादव, दशरथ माळी आणि प्रकाश कोटवानी अशा २० जणांचा ठाणे गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर शिक्षण, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या २४ विद्यार्थ्यांचा ठाणे विशेष म्हणून सन्मान करण्यात आला. तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ९६ व्यक्तींचा ठाणे गुणीजन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ठाणे महापालिकेतर्फे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०१८ च्या विजेत्या स्पर्धकांना यावेळी पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे केरळमधील पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल ठाण्यातील डॉक्टरांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

 

Leave a Comment

%d bloggers like this: