ठाण्यातील बहुचर्चित टाऊन हॉल आता अजून आधुनिक आणि उपयोगी होईल अशात-हेनं विकसित केला जाणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाण्यातील कलाकारांच्या संस्थेशी यासंदर्भात चर्चा केली यावेळी उपस्थित कलावंतांनी टाऊन हॉल आधुनिक आणि उपयोगी होईल अशात-हेनं विकसित करण्यासाठी काही सूचना केल्या. हॉल वातानुकुलित करणं, स्वच्छता ठेवणं, ध्वनीरोधक बसवणं, प्रकाश योजना, ध्वनी व्यवस्था, हॉलचं व्यवस्थापन व्यावसायिक पध्दतीनं करणं अशा अनेक सूचना कलाकारांनी केल्या. आमदार संजय केळकर तसंच पालकमंत्र्यांनीही टाऊन हॉलबाबत काही सूचना केल्या आहेत. जिल्हाधिका-यांनी टाऊन हॉल आधुनिक आणि उपयोगी होण्यासाठी नियोजन केलं जाईल असं आश्वासन निवेदनकर्त्यांना दिलं.
