ठाण्यातही लवकरच ई-चलनाद्वारे दंड आकारणी

राज्यात एकाच वेळी ई-चलन प्रणाली राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या प्रणालीचा शुभारंभ महिनाभरात होणार असून दंडवसुलीसाठी ठाण्यातही लवकरच ई-चलनाद्वारे दंड आकारणी होणार आहे. ई-चलनाबाबत वाहतूक पोलीसांना प्रशिक्षण देण्यात आलं असून ३०० यंत्र दाखल झाल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये ठाणे वाहतूक शाखेच्या १८ उपशाखा आहेत. त्यामध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणा-यांकडून दंडवसुली केली जाणार आहे. ही यंत्रं हाताळणीचं प्रशिक्षण अधिकारी-कर्मचा-यांना देण्यात आल्याचं अमित काळे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading