ठाणे शहर हागणदारी मुक्त

ठाणे शहर हागणदारी मुक्त झालं असून केंद्र शासनाच्या पथकानं गेल्या महिन्यात केलेल्या फेरतपासणी अंती ठाणे शहर हागणदारी मुक्त असल्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या त्रयस्थ संस्थेच्या पथकानं महापालिका क्षेत्रातील १७ ठिकाणची २ दिवसापूर्वी आकस्मिक पाहणी केली. यामध्ये विटावा, शिवाजीनगर, गांधीनगर, समर्थनगर, वैतीवाडी, रामचंद्रनगर, रामबाग, पडवळनगर, रघुनाथनगर, वासुदेव बळवंत फडके मार्ग, कळवा मार्केट, खारेगाव मार्केट, शरीफा रोड, इराणी विद्या मंदिर, शिवाई विद्यालय, आझाद इंग्लिश स्कूल, एस. टी. लॉरेन्स स्कूल, डिसोझावाडी, कचराळी तलाव या ठिकाणांचा यामध्ये समावेश होता. या भागात वैयक्तीक आणि सार्वजनिक शौचालयं पुरवण्यात आली आहेत. दर ६ महिन्याच्या अंतरानं त्रयस्थ पथकाकडून पाहणी केली जाते. त्यानुसार यापूर्वीही शहरातील काही भाग हागणदारी मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading