ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणा-या दुष्परिणामांबाबत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अभियानात विविध प्रकारच्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. रांगोळी स्पर्धा, पोस्टर पेंटींग, स्लोगन, वक्तृत्व स्पर्धा आणि समूह नृत्य अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या विविध स्पर्धांमध्ये जवळपास ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या अभियानादरम्यान पोलीसांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनानं मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि पालकांचे विद्यार्थ्यांसोबत नातं कसं असावं याबाबत मार्गदर्शन केलं.

Leave a Comment

%d bloggers like this: