ठाणे महापौर जलतरण चषक स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या जलतरण पटूंची पदकांची लयलूट

ठाणे महापौर जलतरण चषक स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या विविध गटातील जलतरण पटूंनी ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि ११ कांस्य पदकांसहीत २ जलतरण पटूंनी वैयक्तीक विजेतेपद पटकावलं. महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेचं पारितोषिक वितरण करण्यात आलं. या जलतरण स्पर्धेत फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय या प्रकारात आदित्य घागनं ४ सुवर्ण, १ कांस्य, सवर आकुसकर १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य, वेदांत गोखलेनं १ सुवर्ण, विहान चतुर्वेदीनं १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य, मीर वीरानं २ सुवर्ण, २ कांस्य, ईदांत चतुर्वेदी, मानव मोरे यांनी प्रत्येकी १ रौप्य, रोहन अंबुरे आणि आर्या गाडे यांनी प्रत्येकी १ कांस्य, ऋग्वेद पाटीलनं १ रौप्य, १ कांस्य, सानिका तापकीरनं २ रौप्य, परिन पाटीलनं १ रौप्य आणि ३ कांस्य पदकं पटकावली तर रिलेमध्ये ८ वर्षीय गटात आदित्य घाग, रोहन अंबुरे, ईशदा चतुर्वेदी, सोहम साळुंखे यांनी सुवर्ण तर १६ वर्षाखालील गटात ईशा शिंदे, सवर आकुसकर, सानिका तापकीर, गार्गी शीटकर यांनी १ कांस्य पदक पटकावलं. १६ वर्षाखालील गटात आशय दगडे, पृथ्वीराज कांबळे, ऋग्वेद पाटील, वेदांत गोखले यांनी कांस्य पदक पटकावले. या जलतरण स्पर्धेमधील ५८ क्रीडा प्रकारात ३५ पदकं स्टारफीशच्या जलतरण पटूंनी पटकावली.

Leave a Comment

%d bloggers like this: