ठाणे महापालिकेनं केलेल्या ४११ निविदा प्रस्तावांच्या छाननीमुळं महापालिकेची ३२ कोटींची बचत

ठाणे महापालिकेनं गेल्या आठवड्यात ४११ निविदा प्रस्तावांची छाननी करून जवळपास २९ कोटींची कामं वगळण्याचा तर २१ कोटींच्या कामांची फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं महापालिकेची जवळपास ३२ कोटींची बचत झाली आहे. महापालिकेच्या निविदा प्रक्रियेमध्ये रिंग झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी सर्व निविदांची छाननी करण्याचे आदेश दिले होते. यासाठी नेमलेल्या समितीनं ४११ प्रस्तावांची छाननी केली. यामध्ये प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता असलेले आणि कार्यादेश न दिलेले ९२ प्रस्ताव, प्रशासकीय मान्यता मिळून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्याचे ४१ प्रस्ताव तर निविदा उघडून मंजुरीच्या प्रक्रियेत असलेल्या २७८ प्रस्तावांचा समावेश होता. या सर्व निविदांचा एकूण अंदाज खर्च १ हजार ४९२ कोटी होता. तर प्राप्त झालेल्या निविदांची रक्कम १ हजार ४४९ कोटी रूपये होते. या सर्वांची छाननी करून संबंधित निविदाकारांची वाटाघाटी करून ही रक्कम १४१७ कोटी रूपयापर्यंत करण्यात आली. या छाननीनुसार २१ कोटी रूपयांच्या प्रस्तावांची फेरनिविदा काढण्याचा निर्णय तर २९ कोटी रूपयांची कामं वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं महापालिकेची ३२ कोटी रूपयांची बचत झाली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: