ठाणे महापालिकेतर्फे ठाण्यातील साडेसहा हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक महिलांना १८ हजार रूपयांचं वार्षिक अनुदान मिळणार आहे. महिला आणि बालकल्याण योजनेअंतर्गत यावर्षी ज्येष्ठ नागरिक महिलांना अनुदान देण्याची योजना होती याअंतर्गत ६३० लाभार्थ्यांची मर्यादा ठेवण्यात आली होती. पण योजना जाहीर झाल्यावर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्यामुळे सगळ्याच ज्येष्ठ नागरिक महिलांना वार्षिक उदरनिर्वाह भत्ता देण्याची मागणी पुढे आली. त्यानंतर साडेबारा हजार अर्ज वितरित करण्यात आले. पण यापैकी ६ हजार ६३८ अर्जदार पात्र ठरले. या सर्वांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जवळपास बारा कोटींचा खर्च येणार आहे.
