ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या बालनाट्य महोत्सवाचं उद्घाटन

ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य महोत्सवाचं उद्घाटन विद्यार्थ्यांच्या उपस्थिती महापौरांच्या हस्ते करण्यात आलं. मुलांमधील कलागुणांना वाव देता यावा यासाठी या महोत्सवाचं आयोजन केलं जातं. शहरातील बाल कलाकारांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आज आणि उद्या बालनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या बालनाट्य महोत्सवात १० बालनाट्यं सादर होणार आहेत. आज लहान मुलांची बाप गोष्ट, मोगलीच्या जंगलात मोटू पतलू, चॉकलेटचे झाड चेटणीकीची धाड, संगोपन, आकार आणि थेंबाचे टपाल या बालनाट्यांचं सादरीकरण झालं. तर सोनेरी स्वप्न, आपटे कोचिंग क्लासेस, एक था टायगर आणि बँक ऑफ बालपण या बालनाट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: