ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना १५ हजार रूपये सानुग्रह अनुदान म्हणून मिळणार

ठाणे महापालिका कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी असून ठाणे महापालिकेच्या सर्व कर्मचा-यांना १५ हजार रूपये सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. महापालिका प्रशासन आणि कर्मचारी संघटनांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना १५ हजार १०० रूपये सानुग्रह अनुदान म्हणून तर कंत्राटी कर्मचा-यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना गेल्या वर्षी सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात आले होते. त्यामुळे यंदा सानुग्रह अनुदानात एक हजारानं वाढ झाली आहे. सानुग्रह अनुदान आणि बोनसमुळे महापालिकेच्या तिजोरीवर १५ कोटींचा बोजा पडणार आहे. महापालिकेचे सर्व कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय, घंटागाडी, रस्ते सफाई, शिक्षण विभाग, पाणी विभाग, उद्यान विभाग, मलनिस्सारण विभाग अशा विविध विभागात काम करणा-या अडीच हजाराहून अधिक कर्मचा-यांना एक महिन्याचं वेतन बोनस म्हणून दिलं जाणार आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: