ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची मुंब्रा आणि कळव्यातील अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील जवळपास ७५ स्टॉल, ८७ बाकडी, २७ ठेले तसेच २० हातगाड्या आणि 40 अनधिकृत डिजिटल बॅनरही जप्त केले. या कारवाई अंतर्गत मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील चाँद नगर, तनवर नगर, कब्रस्तानरोड इद्यादी परिसरातील ७५ स्टॉल, ८७ बाकडे, ५६ प्लास्टिक बांबूशेड, ३७ ठेले तोडण्यात आले. या परिसरातील 40 डिजिटल बँनरसह २० हात गाड्या जप्त करत अनधिकृत सर्विस स्टेशनचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर कळवा प्रभाग समितीतील  15 प्लास्टिक बांबूशेड,7 लोखंडी टपऱ्या आणि  10 हातगाड्या जप्त करण्यात आल्या. यापुढेही शहरातील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या आणि  बॅनरवर महापलिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: