ठाणे महापालिका करणार घनकच-यापासून वीज निर्मिती

ठाणे महापालिका कच-यापासून वीज निर्मिती करणार आहे. शहरामध्ये निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट कशी लावायची यावरून प्रश्न निर्माण होत असतानाच त्यावर उपाय म्हणून महापालिकेनं कच-यापासून वीज निर्मिती करण्याचं ठरवलं आहे. ठाणे महापालिका यासाठी शहरातील कच-याबरोबरच जवळ असलेल्या महापालिकांच्याही कच-याची विल्हेवाट लावणार आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या महापालिकांमध्ये निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट लावणार आहे. डायघर येथे यासाठी प्रकल्प उभारला जात असून या प्रकल्पात ही कच-यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading