ठाणे मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा दुस-या कैद्यावर कात्रीनं जीवघेणा हल्ला

ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांमधील हाणामा-या नित्याच्या झाल्या असून मंगळवारीही एका कैद्यानं दुस-या कैद्यावर कात्रीनं जीवघेणा हल्ला करण्याची घटना घडली. ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात जाफर खान आणि मेहजाबुद्दीन खान हे दोघे शिक्षा भोगत आहेत. या दोघांनाही कारागृह प्रशासनानं शिवणकाम करण्याचं काम दिलं आहे. मंगळवारी जाफर खान हा नेहमीप्रमाणे शिवणकाम करत असताना गाणं गात होता. तेव्हा त्याच्या मागे बसलेल्या मेहजाबुद्दीनला जाफर हा त्याला शिवीगाळ करत असल्याचं वाटलं. त्यातून या दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी मेहजाबुद्दीननं जाफरच्या डोक्यावर कात्रीनं हल्ला केला. या प्रकरणी मेहजाबुद्दीन खानवर गुन्हा दाखल झाला आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: