ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये महिला दिन साजरा

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्येही महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनाच्या निमित्तानं पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी आणि कर्मचा-यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. महिलांना कामाच्या ठिकाणी समान संधी देऊन महिलांच्या समस्याही जाणून घेतल्या. यावेळी महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांकरिता सायबर सुरक्षा आणि सुरक्षितता विषयक प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील सर्व पोलीस ठाणी आणि विविध शाखांमध्ये महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading