ठाणे पोलीसांनी केला बनावट अमूल बटरचा मोठा साठा जप्त

ठाणे पोलीसांनी बनावट अमूल बटरचा मोठा साठा जप्त केला आहे. घोडबंदर जवळील औद्योगिक वसाहतीतील एका गाळ्यामध्ये हे बनावट अमूल बटर तयार करण्याचा कारखाना सुरू होता. पोलीसांनी मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी छापा टाकला आणि १ हजार किलो बनावट अमूल बटरचा साठा जप्त केला. कारखान्यात तयार केलेले बटर हे अमूलच्या वेष्टनामध्ये पॅक केलं जात असे. हे बटर प्रामुख्याने हातगाडी, हॉटेल आणि बार अशा ठिकाणी पुरवलं जात होतं. आता हा कारखाना बंद करण्यात आला असून अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी अधिक तपासणी करत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: