ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे उद्या चलनी नोटा आणि नाण्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन

ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे उद्या चलनी नोटा आणि नाण्यांच्या एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात १९३ देशातील चलनी नोटा पहायला मिळणार आहेत. गियाना देशातील श्रीकृष्ण रंगपंचमी खेळत असल्याचं चित्र, इंडोनेशियातील नोटेवरील श्रीगणेशाचं चित्र, भारतातील पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटीश राजवटीतील दुर्मिळ नोटा, झिम्बॉब्वेची १०० ट्रिलियनची नोट, १९७८ मध्ये भारतीय चलनातून रद्द झालेली १ हजाराची नोट, अकबर, औरंगजेब आणि शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील नाणी या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: