ठाणे मध्यवर्ती कारागृहात मोक्का खाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यानं कारागृहातील रूग्णालयात तोडफोड करून मुख्य वैद्यकीय अधिका-याला शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैद्यांवर उपचार करण्यासाठी दवाखाना आहे. या दवाखान्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश गमे हे इतर कैद्यांवर उपचार करत असताना अनुप गोंधळी हा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला मोक्काचा आरोपी इथे आला. त्यावेळी नर्सिंग ऑर्डली महेंद्र पाटील याने गोंधळीला इंजेक्शन देऊन गोळ्या घेण्यास सांगितलं. तेव्हा त्याने डॉक्टरांना शिवीगाळ करून इथे आपल्यावर उपचार होत नाहीत आपल्याला बाहेरच्या रूग्णालयात पाठवावे असा तगादा लावला तसंच रूग्णालयातील सलाईनच्या लोखंडी स्टँडने ट्यूबलाईट आणि इतर साहित्याची तोडफोड करत १० दिवसात बघून घेण्याची धमकी दिली. उपचारासाठी कारागृहाबाहेर नेलं जात असल्याच्या रागातून त्यानं हे कृत्य केल्याचं सांगितलं जातं. डॉक्टरांनी याप्रकरणी कारागृह अधिक्षकांकडे तक्रार केली आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/09/Thane-Central-Jail-1.jpg)