ठाणेकरांच्या सेवेसाठी आयुक्त पदाच्या अखेरच्या दिवसापर्यंत कटिबध्द राहणार – संजीव जयस्वाल

ठाणेकरांच्या सेवेसाठी आयुक्त पदाच्या अखेरच्या दिवसापर्यंत कटिबध्द राहणार असून ठाण्याची स्मार्ट सिटीकडे जोरदार वाटचाल सुरू आहे. त्यामुळं येत्या काही वर्षात शहराच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले जातील अशी ग्वाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या महाराष्ट्र महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात बोलताना पालिका आयुक्तांनी ही ग्वाही दिली. शिवसेना घोडबंदर रोड विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या महाराष्ट्र महोत्सवात आगरी-कोळी पध्दतीचे रूचकर पदार्थ, बॉलिवूड कव्वाली मवाली दरबार, कलर्स वाहिनीवरील छोट्या सूरवीरांचा जलवा, विनोदवीरांचा कॉमेडी तडका अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पालिका आयुक्तांच्या ४ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळाचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजक नरेश मणेरा यांनी केला. महापालिका आयुक्तांच्या विशेष सन्मानानंतर उपस्थित प्रेक्षकांनी मोबाईल फ्लॅश सुरू करून त्यांच्या कार्याला अनोखी पावती दिली.

Leave a Comment

%d bloggers like this: