ठाणेकरांच्या नववर्षाची सुरूवात ४ अग्नितांडवांनी

नववर्षाची सुरूवात आज ठाण्यात ४ आगींनी झाली. रात्री पाऊणच्या सुमारास खारेगाव येथील चायनीज सेंटरमध्ये मोठी आग लागली होती. ठाणे महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन या आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास कोळीवाड्यातील रसिका मंडप डेकोरेटर्सला मोठी आग लागली होती. चेंदणी कोळीवाड्यातील सिध्दीविनायक फॅब्रिकेटर्स शॉपच्या बाजूला असलेल्या रसिका डेकोरेटर्सच्या कार्यालयाला ही आग लागली होती. ही आग मोठी होती मात्र या आगीतही सुदैवानं कोणतीही जिवितहानी झाली नाही. दुपारी १ च्या सुमारास कावेसर येथील महापालिका शाळाच्या बाजूला आग लागली होती. ठाणे महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. वाघबीळ गावात नवीनच बांधल्या जात असलेल्या इमारतीतील भंगारला आग लागली होती. या आगीमध्येही सुदैवानं कोणतंच नुकसान झालं नाही. पण नव्या वर्षाची सुरूवात मात्र या ४ आगींनी झाली.

Leave a Comment

%d bloggers like this: