जिल्ह्यामध्ये ३ लाख ५४ हजार मतदारांची वाढ

जिल्ह्यामध्ये ३ लाख ५४ हजार मतदारांची वाढ झाली आहे. जिल्हाधिका-यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हाधिका-यांनी ही माहिती दिली. ठाण्यामध्ये राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून नवमतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या कलाकारांनीही मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. युवा मतदारांना मतदानाच्या कर्तव्याचा संदेश देण्यासाठी माझ्या नव-याची बायको फेम अनिता दाते, अभिजित खांडकेकर, शनाया, डोंबिवली फास्टचे संदीप कुलकर्णी असे कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आपला माणूस या चक्रात न अडकता देशासाठी अहोरात्र झटणा-यांना मतदान करा असा सल्ला अनिता दाते यांनी यावेळी दिला. जर मतदानाचा हक्क बजावणार नसाल तर व्यवस्थेवर बोलण्याचा काहीच हक्क नाही त्यामुळं मतदानाचं कर्तव्य बजावलं पाहिजे असं संदीप कुलकर्णी यांनी सांगितलं. युवा मतदारांनी मतदान प्रक्रियेत अधिकाधिक सहभागी होण्यासाठी निबंध, वक्तृत्व, रांगोळी अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नवोदित, दिव्यांग मतदार यांना प्रातिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. मतदार नोंदणीत उल्लेखनीय काम करणा-या अधिकारी-कर्मचा-यांनाही गौरवण्यात आलं. जिल्हाधिका-यांनी यावेळी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली.

Leave a Comment

%d bloggers like this: