जिल्ह्यामध्ये विशेष मतदार नोंदणी मोहिमेला १० हजार जणांनी नोंदणी करून दिला प्रतिसाद

जिल्ह्यातील मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत १० हजारापेक्षा जास्त जणांनी नोंदणी अर्ज भरून या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला. २३ आणि २४ फेब्रुवारीला या विशेष नोंदणी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. १८ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर ही नोंदणी करण्यात आली. नव्या मतदार नोंदणीसाठी १० हजार ९०२ जणांनी अर्ज भरून दिले. नाव वगळण्यासाठी १ हजार १०७ जणांनी अर्ज केले. मतदार यादीतील नोंदींच्या तपशीलामध्ये दुरूस्ती करण्यासाठी २२३ जणांनी अर्ज केले. तर मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी १९० जणांनी अर्ज दाखल केले. आता पुन्हा २ आणि ३ मार्च रोजी अशीच नोंदणी होणार असून लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही अखेरची संधी असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: