ठाणे जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या रात्री १२ पर्यंत ध्वनीवर्धन वापरता येणार आहेत.जिल्हाधिका-यांनी आज आणि उद्या असे दोन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापरास परवानगी दिली आहे. सुरूवातीला १७ आणि १८ तारखेस १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता जिल्ह्यामध्ये एकच कालमर्यादा असण्याच्या दृष्टीनं आज आणि उद्या रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
