जिल्ह्यातील अंतिम मतदारयादीमध्ये ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार

जिल्ह्यामध्ये मध्यमवयीन गटात सर्वाधिक म्हणजे १५ लाख ६३ हजार मतदार आहेत. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली असून यामध्ये ही माहिती आहे. जिल्ह्यामध्ये ३१ जानेवारी अखेर ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी-अरोलकर यांनी दिली. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४ लाख ३४ हजार ९३५ मतदार ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. मीरा-भाईंदर ४ लाख ४२ हजार २७९, कल्याण पश्चिम ४ लाख २८ हजार, ओवळा-माजिवडा ४ लाख २१ हजार, कल्याण ग्रामीण ४ लाख ३ हजार, मुरबाड ३ लाख ७८ हजार, बेलापूर ३ लाख ६८ हजार, मुंब्रा-कळवा ३ लाख २८, अंबरनाथ ३ लाख २ हजार, कल्याण पूर्व ३ लाख ३३ हजार, डोंबिवली ३ लाख ३८ हजार, कोपरी-पाचपाखाडी ३ लाख ४२ हजार, ठाणे ३ लाख १८ हजार, भिवंडी २ लाख ७९ हजार, शहापूर २ लाख ४४ हजार, भिवंडी पश्चिम २ लाख ६४ हजार, भिवंडी पूर्व २ लाख ६३ हजार तर उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात २ लाख ८१ हजार मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे २ लाख १ हजार महिला मतदार आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ लाख ९६ हजार, ओवळा-माजिवडामध्ये १ लाख ९१ हजार, ऐरोलीमध्ये १ लाख ८५ हजार तर सर्वात कमी म्हणजे ९९ हजार महिला मतदार उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात आहेत. जिल्ह्यामध्ये मतदारांच्या छायाचित्रासह ओळखपत्रांचं काम ८७ टक्के झालं आहे. जिल्ह्यामध्ये एकूण मतदारांच्या तुलनेत १५ टक्के म्हणजे ९ लाख ४३ हजार हे तरूण मतदार आहेत. ३० ते ३९ या गटात १४ लाख ७१ हजार तर ४० ते ४९ या वयोगटात १५ लाख ६३ हजार मतदार आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: