चेंदणी कोळीवाडा आणि आगरी कोळीवाडा यांना जोडणाऱ्या ब्रिजची नरेश म्हस्के यांनी केली पाहणी

चेंदणी कोळीवाडा आणि आगरी कोळीवाडा यांना जोडणाऱ्या ब्रिजची नरेश म्हस्के यांनी पाहणी केली. ठाण्यातील कोपरी पूर्व असलेला चेंदणी कोळीवाडा आणि आगरी कोळीवाडा यांना जोडणारा महत्त्वाचा असलेला रेल्वे ब्रिज अचानक रेल्वेने बंद केल्याने संपूर्ण कोपरी कोळीवाडा परिसरातील नागरिक हवालदिल झाले असून या ब्रिजमुळे आमची अनेक कामे होत नसल्याचे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या ब्रिजची शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकारी महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांच्या समवेत पाहणी करून लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. तर जोपर्यंत हा ब्रिज पूर्ण रिपेअरिंग अथवा नवीन होत नाही तोपर्यंत रेल्वेच्या पुलावरून येणारा जाणारा नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करू नये असे देखील यावेळी नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading