घरात शिरून चोरी करणा-या चोरट्याला घरमालकानंच रंगेहात पकडलं

नववर्ष स्वागत पार्टी करण्यासाठी सासुरवाडीला गेलेल्या कुटुंबाच्या घरात शिरून चोरी करणा-या चोरट्याला घरमालकानंच रंगेहात पकडण्याचा प्रकार नववर्षाच्या सुरूवातीला घडला आहे. ठाण्यातील पोखरण रोड नंबर २, गांधीनगर येथे राहणारे विनोद गुप्ता हे आपल्या पत्नीसह थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी जवळच राहणा-या सास-यांच्या घरी गेले होते. कुटुंबियांसमवेत नववर्ष पार्टी आटपून पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा त्यांनी घराचं कुलुप उघडलं असता घरातील दिवे सुरू असल्याचं दिसलं. उजेडात घरातील कपाटं उघडून प्रवीण यादव हा चोरी करत होता. घरमालक गुप्ता दाम्पत्याला पाहताच चोरट्याने त्यांना धक्का मारून घरातून पळ काढला. तेव्हा ओरडाआरड ऐकून धावून आलेल्या शेजारील त्रिभुवन गुप्ता आणि त्यांनी काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी आलेल्या गस्तीवरील पोलीसांनी चोरट्याची झडती घेतली असता चोरी केलेली रोकड आणि चांदीचे पैंजण असा ऐवज जप्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading