ग्रँड कॅन्टाटा -ए म्युझिकल ड्रामा हा विशेष सांगितीक कार्यक्रम संपन्न

रोजच्या धावपळीच्या जीवनात तणावग्रस्त आयुष्यातून उत्तम निरोगी आयुष्य कसं जगावं यासाठी ठाणे महापालिका आणि इंटरनॅशनल युथ फेलोशिप यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ग्रँड कॅन्टाटा -ए म्युझिकल ड्रामा हा विशेष सांगितीक कार्यक्रम घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला. या कार्यक्रमास इंटरनॅशनल युथ फेलोशिप साऊथ कोरियाचे विभागीय संचालक किम जाम मिन हेही उपस्थित होते. ग्रँड कॅन्टाटा -ए म्युझिकल ड्रामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन तणावग्रस्त जीवनातून आपण निरोगी आयुष्याकडे कशी वाटचाल करू शकतो तसंच रोजच्या जीवनात कशाप्रकारे आपले वर्तन असायले हवे आदी गोष्टी मधुर संगीताच्या कार्यक्रमातून सादर करण्यात आल्या. या सांगितीक कार्यक्रमात जवळपास ५० हून अधिक कलाकारांनी आपली कला सादर केली.

Leave a Comment

%d bloggers like this: