पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया या स्पर्धेत ठाण्याच्या २ खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. ठाण्यातील ज्युदो पटू अपूर्वा पाटील हिनं आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलं. याच महिन्यात विशाखापट्टणम् इथे झालेल्या नॅशनल ज्युदो चॅम्पियनशीप स्पर्धेत तिनं रौप्य पदक पटकावलं होतं. तर ठाण्यातील अमन फरोग या खेळाडूनेही खेलो इंडिया स्पर्धेत २१ वर्षाखालील गटात बॅडमिंटनमध्ये फरोगनं सुवर्णपदक पटकावलं आहे. अमन फरोग हा उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम यांचा मुलगा आहे.
