खिडकाळी येथील ११३ हेक्टर जमिनीवरील एज्युकेशन हबला शासनाची मंजुरी

ठाण्यातही एज्युकेशन हब निर्माण व्हावं आणि आयआयटी सारख्या उच्च दर्जाच्या शिक्षण संस्था ठाण्यात याव्या यासाठी खिडकाळी येथील ११३ हेक्टर जमिनीवरील आरक्षण बदलाला शासनानं मान्यता दिली आहे. ठाण्यात शिक्षणाच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू होते. खिडकाळी येथील ११३ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर एज्युकेशन हब विकसित करण्याचा निर्णय घेऊन या जागेवरील आरक्षण बदलाचा प्रस्ताव २०१६ मध्ये सर्वसाधारण सभेनं मंजूर केला होता. या जागेवर क्रीडा संकुल आणि हरित विभागाचं आरक्षण होतं. त्यामध्ये बदल करून ही जागा शैक्षणिक कारणाकरिता आरक्षित करण्याबाबतचा फेरबदल मंजूर करण्यात आला होता. हरित क्षेत्राऐवजी शिक्षणासाठीचे आरक्षण झाल्यामुळं जमीन अधिग्रहणात शेतक-यांना चांगला मोबदला मिळणार आहे. वसई- अलिबाग मल्टीमॉडेल कॅरिडॉरपासून २ किलोमीटरवर ही जागा असून जलवाहतूक, मेट्रो, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे केंद्र अशा विविध प्रकल्पांमुळे एज्युकेशन हबसाठी या जागेची निवड करण्यात आली आहे. ठाण्यातील विद्यार्थ्यांना या एज्युकेशन हबचा मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: