सध्या बनावट नोटा चलनात दिसत असून कोपरीतील रिक्षा चालकाला अशीच १०० रूपयांची बनावट नोट देऊन फसवण्याची घटना घडली आहे. या रिक्षा चालकाला एका प्रवाशानं १०० रूपयांची बनावट नोट दिली. या नोटेवर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असून सर्वसाधारण १०० रूपयांच्या नोटेपेक्षा आकारानं ही नोट थोडी लहान आहे. कागद गुळगुळीत असून महात्मा गांधींचा फोटो व्यवस्थित छपाई झालेला नाही. या प्रकारामुळं नोटा बदलून फारसा उपयोग झाला नसल्याचं दिसत असून अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य माणसाला नाहक त्याचा फटका बसत आहे.
