कोकण इतिहास परिषदेचे नववे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन कल्याणमध्ये १२ आणि १३ जानेवारीला

कोकण इतिहास परिषदेचे नववे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन कल्याणमधील जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात १२ आणि १३ जानेवारीला होणार आहे. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या अधिवेशनाचं अध्यक्षपद इंडोलॉजी डिपार्टमेंटच्या प्रमुख डॉ. मंजिरी भालेराव भुषवणार आहेत. यावर्षी दुर्ग तपस्वी आप्पा परब यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. महाड येथे झालेल्या कोकण इतिहास परिषदेतील शोधनिबंधाच्या पुस्तकाचे प्रकाशन तसंच कोकण इतिहास पत्रिका या पुस्तकाचं प्रकाशन या परिषदेत होणार आहे. कोकण विषयक निबंध स्पर्धा, किल्ले स्पर्धा, मोडी लिपी अभ्यास सराव स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा होणार असून त्यांना पारितोषिकंही दिली जाणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading