केंद्र शासनाचं एक पथक पालघर मधील भूकंपाची पाहणी करणार

केंद्र शासनाचं एक पथक पालघर मधील भूकंपाची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात पालघरला भेट देणार आहे. पालघर जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये अलिकडेच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. या धक्क्यांमुळे काहीशी घबराटही निर्माण झाली होती. डहाणू आणि तलासरीमध्ये ३ रिश्टर स्केलचे सौम्य धक्के अनेकदा जाणवले होते. केंद्राचं पथक या परिसरातील भूगर्भाचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी भेट देणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: