किन्नरांना न्याय मिळाल्यामुळं महिला दिन हा आपल्या सामाजिक आयुष्यातील आनंदाचा क्षण – महापौर

किन्नरांना न्याय मिळाल्यामुळं महिला दिन हा आपल्या सामाजिक आयुष्यातील आनंदाचा क्षण असल्याचे उद्गार महापौर मिनाक्षी शिंदे यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले. ठाणे महापालिकेच्या वतीनं महिला दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. किन्नरांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावं यासाठी महापालिकेच्या समाजविकास माध्यमातून विविध योजना सुरू कराव्यात यासाठी महापौरांनी महापालिका तसंच शासनाकडे पाठपुरावा केला होता. महापालिकेच्या माध्यमातून या आर्थिक वर्षात किन्नरांसाठी राबवण्यात येणा-या योजनांमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम घेणं, किन्नर व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी शिबीर, आरोग्य जनजागृती कार्यक्रम तसंच उदरनिर्वाहापोटी प्रति लाभार्थी १८ हजारांचे अनुदान अशा योजनांचा समावेश असून अशा योजना राबवणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका असल्याचं महापौरांनी यावेळी सांगितलं. आज ख-या अर्थानं आम्ही भारताचे नागरिक आणि समाजाचे एक घटक आहोत याची जाणीव झाली. याचे सर्व श्रेय महापौर मिनाक्षी शिंदे यांना असल्याची प्रतिक्रिया किन्नरांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी महापालिका कर्मचा-यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं.

Leave a Comment

%d bloggers like this: