किनारा नियमन क्षेत्रामधील बांधकामांवर कारवाई करण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय

किनारा नियमन क्षेत्रामधील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला असून त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी खारफुटीचं क्षेत्रफळ १ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे. त्या ठिकाणी ५० मीटर ना-बांधकाम क्षेत्रात उभ्या राहिलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. महापालिका हद्दीची सॅटेलाईट प्रतिमा तयार करणं, २००५ आणि सध्याच्या स्थितीमधील तफावतीचा आढावा घेणं, खारफुटीच्या क्षेत्राचं ड्रोन कॅमे-याद्वारे चित्रीकरण करणं, खारफुटी असेलल्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून संरक्षक भिंत बांधणं, खारफुटीची कत्तल रोखण्यासाठी तक्रार निवारण प्रणाली तयार करणं अशा गोष्टी करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. खारफुटीच्या सद्यस्थितीची पाहणी करून खारफुटीच्या क्षेत्राचे नकाशे तयार करून हे क्षेत्र २००५-०६ च्या पूर्व स्थितीमध्ये आणण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: