ऐन गर्दीच्या वेळी पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक सकाळच्या सुमारास विस्कळीत झाली होती. सकाळच्या १०च्या सुमारास मनमाडहून मुंबईकडे येणा-या पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग पत्रीपूलाजवळ तुटले त्यामुळं पंचवटी एक्सप्रेसचे इंजिनपासूनचे दोन डबे इंजिनबरोबर धावले तर मागचे डबे मागेच राहिले. हा प्रकार लक्षात येताच पंचवटी एक्सप्रेस तातडीनं थांबवण्यात आली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. काही वेळानं हे कपलिंग दुरूस्त करून गाडी मार्गस्थ करण्यात आली. मात्र यामुळं मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. ऐन कामावर जाण्याच्या वेळेस हा प्रकार झाल्यानं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.

Leave a Comment

%d bloggers like this: