एका महिला पोलीस नाईकाची दुस-या महिलेकडून १३ लाखांहून अधिक रक्कमेची फसवणूक

ठाण्यातील एका महिला पोलीस नाईक यांची सुमारे १४ लाखांची फसवणूक झाली आहे. तिला एका चांगल्या गृहसंकुलात सदनिका आणि तिच्या पतीस परदेशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून एका महिलेनं ही फसवणूक केली आहे. दीपाली म्हणून ओळख दिलेल्या महिलेनं या महिला पोलीस नाईकला एका चांगल्या गृहसंकुलात १ कोटीची सदनिका ५० लाखात आणि तिच्या पतीला परदेशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं. याकरता तिने महिला पोलीस नाईक यांच्याकडून सुमारे १३ लाख ८१ हजाराची रक्कम आगाऊ घेतली होती. मात्र तिने दिलेलं वचन पाळलं नाही. तिला दुस-या एका प्रकरणात अटक झाली त्यावेळी या महिला पोलीस नाईकला आपण फसवलो गेलो असल्याचं लक्षात आलं आणि तिने पोलीसांकडे तक्रार केली. आता या महिलेला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading