उथळसर भागात सिलेंडरचा स्फोटात चार जखमी तर एका महिलेचा मृत्यू

ठाण्यातील उथळसर भागात सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत चार जखमी आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. उथळसर मधील प्रवीण स्टोर्सच्या मागे तळमजला अधिक एक असं घर आहे. सकाळी दहाच्या सुमारास या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये घरातील एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी झाले, तर स्फोटामुळे घराची भिंत पडल्याने बाजूच्या घरात राहणाऱ्या कांताबाई वानखेडे यांचा मृत्यू झाला. संदीप काकडे, हिमांशू काकडे, वंदना काकडे, लतिका काकडे असे चौघे जण यामध्ये जखमी आहेत. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन नियंत्रणात आणली.

Leave a Comment

%d bloggers like this: