उत्पन्न वाढीसाठी गंभीरपणे काम करण्याची सर्व अधिका-यांना महापालिका आयुक्तांची सूचना

महापालिकेच्या विविध विभागांनी महसुल वाढीसाठी गंभीरपणे काम करावे अशा कडक सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांना आणि विभाग प्रमुखांना दिल्या.महापालिका अधिका-यांच्या बैठकीमध्ये पालिका आयुक्तांनी विविध विभागनिहाय वसुलीचा आढावा घेवून वसुलीचे जे उदिष्ट दिले आहे ते उदिष्ट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी गंभीरपणे काम करण्याविषयी स्पष्ट शब्दात सांगितले.मालमत्ता कर वाढविण्यासाठी सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, कर निरीक्षक यांनी आपल्या स्तरावर वसुलीसाठी कठोर पावले उचलावित तसंच पाणी वसुलीबाबत विभागाने वेळेत पाणी बिलांचे वितरण करून वसुली करावी अशा सक्त सूचना पालिका आयुक्तांनी सर्व अधिका-यांना दिल्या. घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण विभाग यांनी केवळ नोटीसी देवून न थांबता वसुलीही करावी अशा सक्त सूचना देतानाच छोटया-छोटया विभागांनीही त्यांना दिलेले वसुलीचे उदिष्ट पूर्ण करावे असे स्पष्ट केले. यावेळी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विविध प्रलंबित प्रकरणांचा, प्रलंबित शासकीय संदर्भांचा आढावा घेवून ती प्रकरणे त्वरीत मार्गी लावावित असे सांगितले.

Leave a Comment

%d bloggers like this: