उच्च शिक्षणास नैतिकतेचे अधिष्ठान हवे – डॉ विजय बेडेकर

जिवनात प्रत्येक क्षेत्रात काम करताना सामाजिक भान आणि नैतिकतेची कास न सोडण्याचा मोलाचा सल्ला विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी दिला. विद्या प्रसारक मंडळ संचालित जोशी-बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बी. एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे महानगरपालिका विधी महाविद्यालय आणि डॉ. वा. ना. बेडेकर व्यवस्थापन संस्था यांचा संयुक्त पदवीदान समारंभ काल झाला त्यावेळी डॉ. बेडेकर यांनी हा सल्ला दिला. या समारंभात कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन आणि विधी या विद्या शाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि विद्या वाचस्पती या पदव्या डॉ. बेडेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या. समारंभाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना नैतिक आणि सामाजिक बांधिलकीची शपथ देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विजय बेडेकर यांनी भारतातील उच्च शिक्षणाचा आढावा घेतला. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांच्या समोर असलेली आव्हानं आणि संधी भारताच्या वाढत्या लोकसंख्येविषयी आणि पदवी प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांच्या अफाट संख्येविषयी तसंच शिक्षणाच्या दर्जाविषयी भाष्य करून त्यावर त्यांनी प्रकाश टाकला.

Leave a Comment

%d bloggers like this: