आशिया चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी स्टारफीशच्या ८ जलतरण पटूंची निवड

कझाखस्थान येथे होणा-या आशिया चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी स्टारफीशच्या ८ जलतरण पटूंची निवड झाली आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या नॅशनल बायथल आणि ट्रायथल चॅम्पियनशीप स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत आयुषी आखाडेनं सुवर्णपदक, विराट ठक्कर, मिहिका सुर्वे आणि नील वैद्य यांनी रौप्य पदक तर यश भोसले, श्रेया शहा यांनी चौथा, राज उपटेवालाने पाचवा तर आरूष सुर्वेनं सहावा क्रमांक पटकावला. या सर्व जलतरण पटूंची कझाखस्तान येथे होणा-या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: