आम आदमी पार्टीच्या लोकसभा अध्यक्षपदी उन्मेश बागवे यांची नियुक्ती

आम आदमी पार्टी ग्रामपंचायत ते लोकसभा अशा राज्यातील सर्व निवडणुका लढवणार आहे. यासाठी संघटन बांधणी सुरू झाली असून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्यामध्ये उन्मेश बागवे, कल्याणमध्ये धनंजय जोगदंड तर भिवंडीत सुभाष ठाकरे यांची लोकसभा संघटन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना पार्टीशी जोडून घेणे, वीज, शिक्षण, पाणी, आरोग्य अशा मुलभूत समस्यांवर आंदोलन छेडून समाजाला पार्टीची ओळख करून देणं, पार्टीची भूमिका जनमानसात रूजवणं, बूथ पातळीपर्यंत पदाधिकारी नियुक्त करणे, निवडणुका ताकदीनं लढवू शकतील अशा संभाव्य उमेदवारांची प्राथमिक निवड करणं या जबाबदा-या लोकसभा संघटन अध्यक्षांना पार पाडाव्या लागणार आहेत. नागपूर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत या नियुक्त्या करण्यात आल्या.

Leave a Comment

%d bloggers like this: