आनंद या विषयावर एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे करण्यात आलं आहे. आनंद म्हणजे नेमका काय, तो कसा मिळवावा आणि कसा टिकवावा अशा अनेक प्रश्नांनी मनुष्याला कायम भेडसावलं आहे. याच आनंदाच्या विविध वाटा शोधण्या आणि अनुभवण्याकरिता विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयानं या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन १८ आणि १९ जानेवारीला केलं आहे. कार्यक्रमाचा आरंभ सोहळा १७ जानेवारीला संध्याकाळी ३ वाजता ठेवण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. डॉ. प्रा. सुभाषचंद्र भेलके आणि पत्रकार लेखक अंबरिश मिश्र यांचं भाषण या कार्यक्रमात होणार आहे. १८ आणि १९ जानेवारी रोजी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रदीप गोखले, समारोपाचे पाहुणे म्हणून डॉ. रविंद्र कोल्हे आणि अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गज वक्ते येणार आहेत. अधिक माहितीसाठी ९९८७११७७०५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
