आनंदाची अनुभूती महत्वाची – डॉ . आनंद नाडकर्णी

ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात १८ आणि १९ जानेवारी रोजी ‘आनंदाचा मागोवा’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अनेक विद्वानांची उपस्थिती लाभली. यामध्ये डॉ.आनंद नाड़कर्णी आणि डॉ. प्रदीप गोखले यांचे महत्वाचे मार्गदर्शनपर बीजभाषण झाले . भारताबाहेरील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. फ्रेंक्लिन अबॉट, डॉ. मायकल शूज यांचीही मोलाची उपस्थिती लाभली. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उद्घाटन सत्रामध्ये प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी परिषदेचा विषय ‘आनंदाचा मागोवा’ याबद्दल अत्यंत थोडक्यात मुद्देसूदपणे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘यावर्षी महाविद्यालयातील सर्वच कार्यक्रमांचा विषय ‘आनंद’ हा असून आपण सर्वच संपूर्ण वर्षभरात आनंदाच्या दिशेने वाटचाल करत होतो. पुराणातील वेदाचा आधार घेत त्या म्हणाल्या, ” प्रत्येक जण आनंदी असला पाहिजे. कोणत्याच जीवाला आयुष्यात दु:ख मिळू नये. या प्रसंगी डॉ. आनंद नाड़कर्णी यांनी आनंदाचे दोन प्रकार सांगितले, ‘अनुभूती’ आणि ‘अभिव्यक्ती’ . अनुभूती म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जेचा परिणाम म्हणून अंतरंगातुन येणारे भाव म्हणजे ‘ अभिव्यक्ती’. अनुभूती शिवाय अभिव्यक्ती असू शकत नाही . तसेच त्यांनी सुख, कैवल्य आणि साधना यांसारख्या विषयांवरही भाष्य केले.आनंद ही संकल्पना मनुष्यजीवनात कधीपासुन आली, त्याचा इतिहास आणि निरनिराळ्या प्रकारांबद्दल त्यांनी सविस्तर सांगितले.अशा रीतीने तत्त्वज्ञान,मानसशास्र आणि समुपदेशन विभागाने आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेचे हे १५ वे वर्ष आहे. डॉ. उमा शंकर, डॉ.सुभाषचंद्र भेळके, डॉ. नीता मेहता, डॉ.अविनाश डिसोजा , प्रा . प्रशांत धर्माधिकारी आणि डॉ.आकाश सिंह राठोर यांचाही परिषदेत समावेश होता.

Leave a Comment

%d bloggers like this: