आता थोडे दिवस उरले आहेत उगीच नादी लागू नका, तोंड उघडलं तर तुम्हांला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही – राजन विचारेंचा इशारा

धर्मवीर चित्रपटातील दृश्यांवर अडीच वर्षानंतर का बोलता, या चित्रपटाचे खरे किस्से आपल्याला माहित आहेत. आता थोडे दिवस उरले आहेत उगीच नादी लागू नका, तोंड उघडलं तर तुम्हांला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही असा खमखमीत इशारा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी दिला. आपल्याला शिवसेनेत 40 वर्ष झाली यांचा उदय आनंद दिघे गेल्यानंतर झाला. बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हते, मोठं वादळ येऊन सुद्धा त्यांनी पक्ष एकसंघ ठेवला. दिघेंवर बाळासाहेबांचा विश्वास होता, पहिली सत्ता या ठाण्याने दिली. 2014 च्या निवडणुकीला ठाण्यातील सैन्य घेऊन ते त्यांच्या मुलासाठी कल्याणला गेले. आपण एकटा राहून इथून निवडून आलो, ते आणि त्यांचा मुलगा एवढंच त्यांना होतं असं राजन विचारे यांनी सांगितलं. आपण सामान्य कार्यकर्ता आहोत कधीच पैसे खर्च करुन आलो नाही, आपल्याकडे तेव्हा खोके नव्हते – त्यांची दोन मुलं गेली त्यावेळी त्यांच्यासोबत होतो. तुम्हाला शिवसेना संपवायची होती. सर्वांना माहित आहे राजन विचारे काय आणि म्हस्के काय आहे. तुम्ही धर्मवीर पिक्चर काढला त्यासाठी तुम्ही पैसे काढले नाही कार्यकर्त्यांनी खिशातून पैसे काढले. तुम्ही फक्त महापालिकेत टेंडरचे पैसे खाण्याचं काम केलं, पालिका खाली केली असा आरोप विचारे यांनी यावेळी केला. आम्ही बोलत नाही, बोलायला लावु नका, तुमची जी आहे ती राहुद्या. आपण अजूनही प्रामाणिक आहोत तुमच्यासारखा गद्दार झालेलो नाही. एकनाथ शिंदेला कंटाळून हा माणुस चाललेला चार आणि पाच आमदार घेऊन हा माणुस काँग्रेस मध्ये जात होता हे फक्त पक्ष फोडून सेटिंग करत राहिले – ठाणे किल्ला हा दिघे आणि शिवसेनेचा होता पण आता काय परिस्थिती करुन ठेवली आहे. कोरोना काळात म्हस्के होते कुठे, मनसेने आंदोलन केल्यावर बाहेर पडले- सत्तेच्या जोरावर शाखा ताब्यात घेतल्या. दिघे साहेबांच्या ऑफिसला कधीच नाव नव्हतं तुम्ही तुमचं नावं दिलं. राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणुन तुम्हाला आमदारकीचं तिकीट मिळालं. तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री ठाण्यासाठी काय केलं ते सांगा. चित्रपटावर आता बोलता इतके दिवस तोंड शिवलं होतं का? पिक्चर चे डायरेकटर तुम्हीच होता- पिक्चर चे खरे किस्से आपल्याला माहित आहेत थोडे दिवस राहिलेत उगाच नादी लागु नका असा इशाराही राजन विचारे यांनी यावेळी दिला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading