आंतरशालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्यातील मुलींना ५ सुवर्णपदकं

मुंबई विभाग आंतरशालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्यानं बाजी मारली असून मुलींनी ५ सुवर्णपदकं पटकावली आहेत. या स्पर्धेत विविध शाळांच्या २०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, कल्याण, डोंबिवली अशा विविध संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. जिल्हा वेटलिफ्टींग प्रशिक्षण केंद्राच्या मुलांनी या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. १७ वर्षाखालील गटात वेदिका टोळ रौप्य पदक, भागवती काजळे कांस्य पदक, साक्षता नाईक कांस्य पदक, साई जुंदरे सुवर्ण पदक, केतकी पाटील सुवर्ण पदक, मृदुला कदम सुवर्ण पदक, रम्या पटेल सुवर्णपदक, १९ वर्षाखालील मुलींच्या गटात लुमिया तारवाडीनं सुवर्ण पदक पटकावलं. तर १९ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रवीण तवारे सुवर्ण पदक, हार्दिक लबडे सुवर्ण पदक, कुश पैनं सुवर्ण पदक पटकावलं. विशेष म्हणजे या स्पर्धेत ५ मुलींनी सुवर्ण पदकं पटकावत बाजी मारली.

 

Leave a Comment

%d bloggers like this: