आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी रूपये किंमत असलेले ४ किलो इफेड्रीन पोलीसांनी केले जप्त

दिवाळीच्या तोंडावर चेन्नईतून ठाण्यामध्ये रेव्ह पार्टीसाठी आणलेले ४ किलो इफेड्रीन पोलीसांनी हस्तगत केले आहे. अविल मॅथेरो याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काल एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी ही माहिती दिली. कौश्यामध्ये इफेड्रीन घेऊन एक जण येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्याआधारे शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजकुमार कोथमिरे आणि त्यांच्या पथकानं कौश्यामध्ये सापळा रचून अविलला अटक केली. त्याच्याकडून २५ लाख रूपये किलो या दरानं विक्रीसाठी आणलेलं ४ किलो इफेड्रीनही जप्त करण्यात आलं. दिवाळीमध्ये रेव्ह पार्टीची मौजमजा करणा-या मुलामुलींसाठी चेन्नईतून हे इफेड्रीन मुंबईत आणल्याचं अविलने चौकशीमध्ये सांगितलं. अविलला यापूर्वीही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं २०११ मध्ये मॅन्टेक्सच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.

Leave a Comment

%d bloggers like this: