अवघ्या ५० रूपयांसाठी वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायानं आपली नोकरी पणाला लावल्याचा प्रकार पहायला मिळाला. गणवेष परिधान केला नाही म्हणून एका रिक्षा चालकाकडून ५० रूपयांची लाच घेणा-या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे. राबोडीतील अफझल शेख हे रिक्षा चालक असून रिक्षा चालवताना त्यांनी गणवेष परिधान केला नव्हता. त्यामुळं वाहतूक पोलीस शिपायानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला. त्यांनी शेख यांच्याकडून ५० रूपये वसूल केले मात्र त्याची पावती दिली नाही. अफझल शेख यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर वाहतूक शिपायावर कारवाई करण्यात आली.
